बीड/प्रतिनिधी ;- कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर राहुल रेखावार , अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी , बीड उपरोक्त क्र .3 मधील अधिसुचना अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार बीड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मोहिम राबविण्याचे आदेश पारीत करत आहे . 1. दि .08 , 09 व 10 ऑगस्ट रोजी बीड शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे , फळ - भाजी विक्रेत्यांचे , दूध विक्रेते , पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे Antigen Test ने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे . 2. सदरील सर्व नियोजन दुकानदार , पेट्रोल पंप चालक व बँकांच्या मदतीनेच करण्यात आले आहे . शहरातील दूध विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता निरिक्षकांद्वारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जायचे आहे आणि शहराबाहेरून येणाऱ्या दूध विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गांवच्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेल्या ठिकाणी शहरातच करण्यात येणार आहे . 3. सर्व प्रकारच्या दुकानदारांच्या संघटनांनी ( किराणा , कपडे , सराफा इ.सर्व ) त्यांच्या सर्व सदस्यांची यादी , फोन नंबर सह दिलेली आहे . या संघटनाच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर संबंधित दुकानदारांनी खालील तक्त्यातील प्रतिनिधींना फोन करुन आपले नांव केवळ या तपासणीच्या कामासाठी दि .07.08.2020 पर्यंत अवश्य नोंदवावे . अ.क्र . संघटना / असोसिएशन प्रतिनिधी ऑईलमिल संघटना 1. श्री . बबनराव गोरे ( 9822534965 ) 2 जालना रोड संघटना 1. श्री . शेळके ( 9921041111 ) सिद्धीविनायक कॉम्लेक्स संघटना 1. श्री . प्रमोद सारड ( 9822335218 ) 4 | जिल्हा मुद्रांक संघटना 1. श्री . गणेश बलदवा ( 9422242351 ) 5 ट्रांसपोर्ट संघटना 1. श्री . गणेश शर्मा ( 9527555567 ) सुभाष रोड संघटना 1. श्री . दिपक कर्नावट ( 9767613161 ) 7 कटलरी व स्टेशनरी संघटना 1. पारस तुनावत ( 9822475030 ) 8 | सी.पी.डी.ए. असोसिएशन 1. श्री.हरिओम धुप्पड ( 9860018808 ) 9 बीड कृषी साहित्य संघटना 1. श्री . भिमराव काळे ( 9422536376 ) 10 | जुना मोंढा व्यापारी संघटना 1. श्री . संतोष सोहनी ( 7875717777 ) 2. श्री . जवाहरजी कांकरिया ( 9422931894 ) धोंडिपुरा / टिळक रोड व्यापारी संघ 1. श्री . हरीओम धुप्पड ( 9860018808 ) 12 | हिरालाल चौक संघटना 1. श्री . शांतिलाल समदरिया ( 9421515152 ) 13 अडत व्यापारी संघटना नवा मोंढा 1. श्री . बद्रीनारायण जाजु ( 9422242645 ) 14 | कारंजा रोड व्यापारी संघटना 1. श्री . केदार मानधने ( 9822527236 ) 15 | बीड शहर मिठाई व फरसान संघटना 1. श्री . जितेंद्र पडझरिया ( 9420003388 ) 16 | आदर्श मार्केट संघटना 1. श्री . प्रकाश कानगांवकर ( 9850351816 ) 17 एकता नगर व्यापारी संघटना नगर रोड 1. श्री . प्रकाश काळे ( 9420655507 ) बीड 18 महात्मा फुले नवी भाजी मंडई संघटना 1. श्री . भास्कर जाधव ( 9422743539 ) 19 सराफा रोड संघटना 1. श्री . महेश शेटे ( 9823727171 ) 20 रिटेल किराणा असोसिएशन 1. श्री . विनोद ललवानी ( 9822626272 ) 21 | सुभाष रोड पुर्व व्यापारी संघटना 1. श्री . भास्करराव गायकवाड ( 8087146448 ) 4. तसेच वरीलपैकी दुकानांच्या प्रकाराव्यतिरिक्त इतर प्रकारच्या दुकान चालवणाऱ्या सर्व व्यक्तींनी खालील प्रतिनिधींना संपर्क करुन आपली नांव नोंदणी करावी . ( 1 ) श्री . भोसले श्रीनिवास , प्रा.शा. नागापुर ( खु . ) - ( 9890445710 ) ( 2 ) श्री . भारती धर्मराज , प्रा.शा.गणेशनगर- ( 9665818867 ) ( 3 ) श्री . दामु रडे शाम , प्रा.शा.गगनाथवाडी- ( 9665630031 ) ( 4 ) श्री . घोरड दिनकर रेवननाथ , प्रा.शा. कुक्कडगांव- ( 9881653657 ) 5. या नोंदणीनंतर प्रत्येकाला एक स्थळ आणि वेळ प्रतिनिधीमार्फत कळविण्यात येईल . बरोबर त्याच वेळी प्रत्येक दुकानदाराने तपासणी साठी यावे . त्याच ठिकाणी एका तासातच तपासणीचा निर्णय दुकानदारांना कळविण्यात येईल . संपूर्ण प्रक्रिया ही कोठेही गर्दी न होता आणि कोविड विषयक सर्व काळजी घेऊन करण्यात येणार आहे . 6. तसेच या मोहीमेनंतर तपासणी झालेल्या दुकानांनाच दुकान उघडण्याची परवानगी राहील परंतु कोणत्याही दुकानदाराने अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये आणि संपूर्ण सहकार्य करावे व सर्व दुकानदारांनी आवर्जुन आपली तपासणी करुन घ्यावी . या तपासणीद्वारे आपण केवळ स्वत : लाच नाही तर आपल्या परिवाराला , घरातील वृद्ध व मुलांना आणि आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारांना सुद्धा सुरक्षित ठेवणार आहात यात शंका नाही . आणि बीड शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास नागरिकांना व प्रशासनास मदत करावी असे आवाहनसुद्धा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे . त्याअनुषंगाने बीड शहरातील सर्व प्रकारची सर्व दुकाने दि .08 , 09 व 10 ऑगस्ट 2020 रोजी बंद राहतील
No comments:
Post a Comment