परळी (प्रतिनिधी )परळी शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल वाहन धारकांचा खड्ड्यांनी स्वागत करणारा एकमेव उड्डाणपूल झाला असून आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवणाऱ्या वाहन धारकांना यातून केव्हा दिलासा मिळणार आणि हे खड्डे कधी बुजवले जाणार असा सवाल सर्वसामान्य जनता आणि त्रस्त वाहनचालक यांच्याकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यामध्ये एकमेव रेल्वेस्थानक असलेले परळी शहर. याठिकाणी वाढलेली प्रचंड वाहनांची गर्दी लक्षात घेऊन आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलावरून होणाऱ्या जड वाहतुकी मुळे उड्डाणपूल धोका दायक बनला आहे. यामध्ये भर पडली आहे ते उड्डाणपुलावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांची. यापूर्वी अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. परंतु जेव्हा महाराष्ट्र शासनाने राज्य रस्त्यालगत एक किलोमीटर अंतरापर्यंत दारू आणि दारूची दुकाने बंद केली. तेव्हा परळी नगरपालिकेने ठराव घेऊन आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे या रस्त्याची देखभाल करण्याचे काम आता नगरपालिकेकडे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर पडलेले खड्डे वर्षांनी का होईना बुजवित होते. परंतु आता उड्डाणपुलावर नाहीतर उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावर प्रचंड खड्डे निर्माण झालेले आहेत खड्ड्यातून खडी बाहेर पडलेली आहे याचाही धोका रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी नागरिकांना बसू शकतो .त्यामुळे वाहनधारक,पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण होणारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे काम न.प.ने करावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.
No comments:
Post a Comment