परळी वैजनाथ ;- (प्रतिनीधी) येथील दोन धर्मात तेढ होईल आशी पोस्ट समाज माध्यमातून केल्याने दोघानां दि.२९.रोजी पोलीसानी ताब्यात घेतले .संभाजी नगर व परळी शहर पोलीसानी या कारवाया केल्या
शहेजादखान जमीलखान पठाण रा.आझाद नगर .यांने दि.२७ रोजी दुपारी १२.१५ वाजता फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली .पो.काॕ.रूपेश शिंदे यांच्या फिर्यादी वरून त्याच्यावर संभाजी नगर पोलीसात कलम ५०५(२) भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला .तर दुसरी कारवाई शहर पोलीसानी केली संदिप चंद्रकांत विभूते ( नेहरू चौक ) याने वादग्रस्त पोस्ट केल्याने पो.ना.समाधान भाजीभाकरे यांच्या फिर्यादिवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला शहर पोलीसानी ताब्यात घेतले .दरम्यान जातीय तेढ निर्माण होईल आशा पोस्ट न करता समाजमाध्यमाचा योग्य उपयोग करावा असे आवहान उपअधीक्षक राहुल धस यांनी केले .
No comments:
Post a Comment