अंबाजोगाई : वाळूच्या भरधाव टिपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांडाजवळ शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
अपघातातील तिघेही मयत वानटाकळी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात अंबाजोगाई पठाण मांडवा रोडवरील काळवीट तांडा परिसरात घडला. अपघातातील टिपर परळी येथील असल्याचे समजते. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असुन पुढील तपास करत आहेत .
No comments:
Post a Comment