
बीड (प्रतिनीधी ) कालपासून मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाने शहरातील दुकानदार, व्यापारी यांच्या ऍन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात रूग्ण बाधीत आढळून येत आहेत. शासनाच्यावतीने ज्याठिकाणी या रूग्णांना ठेवले जाते अशा शासकीय आयटीआय आणि इतर ठिकाणी रूग्ण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ज्या बाधीत रूग्णाकडे होम क्वारंटाईन होण्यासाठी सर्व सोयी सुविधा आहेत. अशा रूग्णांना होम क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
ज्या रूग्णाकडे मोठे घर आहे, स्वतंत्र संडास,बाथरूम आहे आणि जो रूग्ण ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये कोणाच्याही संपर्कात येणार नाही अशा रूग्णांनी आरोग्य विभागाला शपथपत्र लिहून दिल्यानंतर आणि आरोग्य विभागाची हा रूग्ण कोणाच्या संपर्कात येणार नाही त्याच्यापासून कोणाला बाधा होणार नाही अशा रूगणांनाच होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. हा निर्णय त्या संबंधीत रूग्णाच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे. ज्या रूग्णांनी होम क्वारंटाईन होण्यासाठी प्रतिज्ञापत्र आरोग्य विभागाला लिहून दिले आहे. अशाच रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment