Monday, August 3, 2020

परळी येथील कोवीड 19 केअर सेंटरला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अशोक थोरात यांची भेट.



परळी वैजनाथ ;--परळी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागास्वर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कोवीड केअर सेंटर आज पासुन कार्यान्वित करण्यात आले आहे.या कोवीड केअर सेंटरला आज जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात, डाॅ. सचिन आंधळकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ अर्शद शेख,स्टाफ इंचार्ज निता मगरे अदी डाॕक्टर्स, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
परळीतील काल कोरोनाग्रस्त म्हणुन निश्पन्न झालेल्या 17 रुग्णा पैकी 13 रुग्णांवर उपचार येथे सुरु करण्यात आले आहेत.लक्षणे नसणारे,व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर परळीच्या कोवीड केअर सेंटरला उपचार करण्यात येणार आहेत.
कोवीड केअर सेंटर हे परळीत सुरु केल्याने आता पाॕझिटिव्ह रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment