Monday, August 3, 2020

बीड ग्रामीण पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड 18 आरोपीसह मुद्दे माल जप्त.



बीड (प्रतिनीधी ): ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिदोड येथील एका हॉटेलमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळताच ग्रामीण पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकत १८ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात घेतला. सदरील कारवाई काल सायंकाळी केली. 
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिदोड रोडवरील बहिरवाडी शिवारातील हॉटेल चालक रोहिदास उत्तम शिंदे रा.शिदोड यांच्या हॉटेल निसर्गमध्ये १८ जण जुगार खेळत असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानंतर काल ६ वा. एपीआय सुजीत बडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलीसांनी धाड टाकली असता यामध्ये १८ आरोपी- दिलीप जोगदंड, मारोती जगन्नाथ गायकवाड, अमोल किसन कानडे, शेख शाहबाज शेख शफीक रा.बालेपीर, आरेफ युनूस पठाण रा.गांधीनगर, महावीर कोठारे रा.विठ्ठल नगर जालना रोड बीड, हरिदास यादवराव कदम रा.शिदोड, शेख सादेक शेख अहमद रा.शुक्रवार पेठ बीड, सुनील उमरलाल सौदा रा. बलभीमनगर वतार वेस, दिनकर माटे रा.लोणी शहाजानपूर, रवींद्र राजूलाल गुरखूदे रा.बाळासाहेब शिंदे नगर बीड, शैलेंद्र किशोर पोहेकर रा.रंगार गल्ली पेठ बीड, गजेंद्र ज्ञानदेव शिंदे माळी गल्ली बीड, निळकंठ उत्तरेश्‍वर कानडे रा.गुरूडगल्ली बीड, अर्जून बापूराव भालशंकर रा.नवनाथनगर बीड, गणेश भगवान भालेकर रा.शिदोड, दत्ता जालींदर शिंदे, रा.शिदोड, संदीप वाघमारे रा.कांबी या आरोपींना तिर्रट नावाचा जुगार खेळताना पकडले. यावेळी रोख रक्कम सह मोबाईल असा एकूण २ लाख २३ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


No comments:

Post a Comment