चाकण (प्रतिनिधी) सध्या चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला मोठ्या प्रमाणावर पालक आणि मुलांचे शालेय शिक्षक जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
मागील काही दिवसातील काही घडणाऱ्या घटनाचा मागोवा घेतला असता, एका चाकण परिसरातील नामांकित शाळेत विद्यार्थिनीच्या शालेय दप्तरात एका विद्यार्थ्याने छोटा कोयता लपून ठेवल्याची घटना समोर आली होती. पण याची कुठे वाच्यता न करता हे प्रकरण शाळेतच मिटवण्याचा घाट शाळेतील शिक्षकांनी व शाळे संबंधित व्यक्तींनी घातल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चाकण परिसरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांनीं संघटित होऊन एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शाळेतही एका परराज्यातील विद्यार्थ्याला गावकीच्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यातील विशेष म्हणजे सर्व मारहाण करणारे व मारखाणारे विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे दिसून आले. आता मुद्दा असा उपस्थित होतो कि, अशा प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे असे कृत्य बाहेर येताच त्याच्या बाबत तातडीने स्थानिक पोलीस विभागाला शाळा प्रशासनाने कळवायला हवे. त्यानंतर पोलीस प्रशासन त्याच्या पालकांना बोलावून त्याला समज किंवा उचित शिक्षा देतील.
No comments:
Post a Comment