पत्रकार संघाच्या मुकनायक कार्यक्रमासाठी मंगळवारी माजलगाव येथे आल्या असता उपनेत्या अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपामध्ये दोन टिम आहेत, एक देंवद्र दुसरी टीम नरेंद्र. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांचे फडणवीस समर्थन करतात याहून दुसरे दुर्दैव काय आहे. राज्यात उर्फी जावेद पेक्षाही महत्वाचे प्रश्न भेडसावत असतांना भाजपातील महिलांकडे कोणताही मुद्दा नसल्याने फक्त जावेद आडनाव असल्यामुळे उर्फी जावेदला टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.
तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणूका कोणी सोबत येवो न येवो शिवसेना स्वतःच्या ताकतीवरच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबूरे, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, अनिल जगताप, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, व्यंकटेश शिंदे, प्रभाकर धरपडे, संदीप माने, नागेश शिनगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment