Sunday, January 22, 2023

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम यांची शैक्षणिक सहल संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम ता परळी चीची शैक्षणिक एक दिवसीय परिसर भेट व शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.
सहली दरम्यान गोपीनाथ गड पांगरी,श्री कंकालेश्वर मंदिर बीड,बीड शहराजवळच साधारण १६२५ ते ३० या काळात बांधली गेलेली भव्य जलवास्तू आहे. 
शहरापासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर खजाना विहिर आहे. या विहिरीचा व्यास सुमारे ५० फूट आहे, तर खोली २३.५ मीटर आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडाही असून त्यावर सहज फिरता येते. याही ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यात आली , श्री क्षेत्र कपिलधार मन्मथस्वामी समाधी व भव्य डोंगराच्या रांगा याचेही दर्शन झाले,श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री नंदकिशोर विभूते यांनी  दुपारी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था केली,तसेच  श्री क्षेत्र चाकरवाडी व योगेश्वरी देवी अंबाजोगाई दर्शन घेऊन सहल संपन्न झाली.
 सहलीच्या यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक अशोक नावंदे सर ,शा.व्य. समिती अध्यक्ष  श्री नवनाथराव नागरगोजे,शिक्षक सर्वश्री महादेव गित्ते सर,सचिन फड सर,श्रीम बबिता शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment