चाकण (प्रतिनिधी) : चाकण शहरात अनेक बोगस इंग्लिश शाळा भरवल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. चाकण शहरात रहिवाशी वस्तीत RTE सर्व नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात या शाळा भरवल्या जात असल्याची माहिती उघड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता थेट रहिवाही वस्तीत एक छोटासा फ्लॅट घेऊन त्यात अशा इंग्लिश माध्यमाच्या शाळा भरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका विद्यार्थ्याकडून १२ ते १५ हजार फी वसूल करून त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा न देता फक्त पैसे कमवायचा धंदा म्हणून या शाळा उघडल्या गेल्या असल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. या प्रकारात LKG व UKG अशा दोन प्रकारच्या शाळांचा समावेश होतो. यातील LKG(Lower Kindergarten) मध्ये तीन ते चार वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यांच्याकडून १२ हजाराच्या वर फी आकारनी केली जाते. तर UKG(Upper Kindergarten) मध्ये चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना शिक्षण दिले जाते. यांच्याकडून १५ हजाराच्या वर फी आकारणी केली जाते. या दोन्ही टप्प्यात विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला जातो. सर्वात प्रथम मुलं नर्सरी आणि LKG मध्ये शिक्षण घेतात. दोन्ही ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर त्यांना UKG मध्ये प्रवेश मिळतो. UKG हा पहिलीच्या वर्गात जाण्यापूर्वीचा टप्पा असतो. पण या पहिल्या टप्प्यातील शिक्षणाचा दर्जा बघितला तर त्यावर चर्चा न केलेलीच बरी अशीच काहीशी परिस्थिति चाकण मधील या बोगस इंग्लिश शाळांची दिसून येते.
No comments:
Post a Comment