*गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी* *_(संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)_*
प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो. स्वतंत्र प्रजासत्ताक होण्यासाठी आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेसह संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, एक आध्यात्मिक प्रजासत्ताक आपल्या जीवनात देखील लागू होते. त्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नाही. ज्याची आजच्या काळात नितांत गरज आहे. असे शिक्षण, नियम ज्यामुळे मनुष्याचा आंतरिक विकास होऊ शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा गाभा असलेले अध्यात्म आपल्या जीवनात, आचरणात आणण्याची गरज आहे. असे होऊ नये की आपण आपले जीवन असेच विस्कटलेले पाहत राहू आणि अधोगतीच्या खाईकडे नेऊ. म्हणूनच हे समजून घेतले पाहिजे की ते कोणते शिक्षण आहे ज्याबद्दल आपले शास्त्र सांगते - सा विद्या या विमुक्तये.
ज्ञान तेच आहे जे मुक्ती देते. ज्यामुळे आपल्या बाह्य विकासाबरोबर अंतर्गत विकासही होतो असे ज्ञान आवश्यक आहे. केवळ शिक्षणानेच अंतर्गत विकास होऊ शकत नाही. त्यासोबतच दीक्षेचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे. दीक्षेची व्याख्या करताना आपले वेद-उपनिषद अगदी छान सांगतात- 'भस्माने झाकलेला अग्नी ज्या प्रकारे मुखातून प्रेरीत झालेल्या वायूने प्रज्वलित होतो.योग्य वेळी पेरलेले बियाणे फलदायी होऊन बहरते. त्याचप्रकारे गुरूंनी दिलेले आत्मज्ञान एखाद्या व्यक्तीच्या / शिष्याच्या/ विद्यार्थ्याच्या जीवनात सद्गुण निर्माण करतात.
आज प्रत्येकजण पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पण रचनेत बदल करायचा असेल तर आधी साचा बदलावा लागतो. म्हणूनच शास्त्र-वेद-ग्रंथांनी घोषित केले की आचार्यांना प्रथम बाह्य ज्ञानाबरोबरच आंतरिक ज्ञानही असले पाहिजे, तरच ते विद्यार्थ्याचा पूर्ण आणि सर्वांगीण विकास करू शकतील.
आज समाजात अशा नवीन व्यवस्थेची गरज आहे जी आपल्या मुलांचा पूर्ण विकास करेल. त्यांच्यात पूर्ण व्यक्तिमत्व निर्माण करेल. परमपूज्य सर्वश्री आशुतोष महाराज जी यांनी दिव्य ज्योति जाग्रति संस्थेच्या माध्यमातून असे संपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे काम हाती घेतले आहे. महाराज जींच्या कृपेने 'मंथन'. असा एक शिक्षण प्रकल्प ज्यामध्ये असे शिक्षक आहेत जे आतून जोडलेले आहेत आणि त्यांच्यात विद्यार्थ्यांना आतून जोडण्याची ताकद आहे. संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी बाह्य शिक्षण आणि अंतर्गत दीक्षा या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, असे महाराज जी अनेकदा सांगतात. यामुळेच आज महाराज जी समाजातील प्रत्येक जीवाला त्या ज्ञानाने जोडत आहेत. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अध्यात्मिक प्रजासत्ताक कार्यान्वित होऊन व्यक्ती समाजाच्या उभारणीस सहकार्य करू शकेल.
भारत हे स्वतः एक स्थिर संस्कृतीचे प्रतीक आहे. भारत = भा + रत ; भा म्हणजे प्रकाश, रत म्हणजे मग्न. जो नेहमी दिव्य प्रकाशात मग्न असतो तो भारतीय असतो. असा देश ज्याच्या नावानेच त्याचे वैभव आणि प्रतिष्ठा वर्णीत होते. सत्याचा मूळ स्त्रोत असल्याचा महिमा फुलवितो. हेच आध्यात्मिक प्रजासत्ताक व्यक्तीच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. तरच आपले जीवन परिपूर्ण होऊ शकते. दिव्य ज्योति जाग्रति संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment