बीड तालुक्यातील ढेकणमोहा या ठिकाणी पवार नामक व्यक्तीकडे राशन दुकान आहे. आज सकाळपासून राशनचे वाटप सुरू आहे. उपस्थित ग्राहकांना दोन-पाच किलोने धान्य दिले जाते. तर ज्यादा पैसे दिल्यानंतर काहींना पोतं आणि कट्ट्याने धान्य वाटप होत असल्याचे संबंधित व्हिडिओत पहावयास मिळत आहे. धान्य देणारा व्यक्ती हे कुठे माहित होऊ देऊ नका, असे म्हणतो तेव्हा कट्ट्याने धान्य घेणारा व्यक्ती इथे तर सर्वांनाच माहित झाले आहे ना’, असे म्हणतो तेव्हा धान्य वाटप करणारा व्यक्ती “इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका” असं म्हणतो. यावरून राशन दुकानातला काळाबाजार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment