Monday, January 30, 2023
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी परळीत मतदानास सुरवात.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरू असून दिनांक 30 रोजी प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी दि. २९ जानेवारी रोजी परळी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी परळी तालुक्यात तीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. परळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुक्यात धर्मापुरी व सिरसाळा येथे मतदान केंद्र असणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी दि.२९ जानेवारी या मतदान केंद्रांना भेटी दिल्या व प्रक्रियेचा आढावा घेतला. सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ ते चार या दरम्यान मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती यां केंद्रावर सकाळी ८.३५ वाजेपर्यंत एकूण 535 पैकी 15 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोस्त ठेवण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment