हिंगोली (प्रतिनिधी) नेहमी कोणता न कोणत्या वादामुळे, कारणावरून व वक्तव्यावरून चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी.! पुन्हा: एकदा एका शासकीय कर्मचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार संतोष बांगर यांनी यापूर्वी.! 1. जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण केली. 2. विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड आणि त्यानंतर कृषी अधिकाऱ्याला धमकावलं. एवढच नव्हे तर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा देखील आरोप आहे. त्यानंतर आता पुन्हा: एकदा आमदार बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्याला मारहाण केली आहे. त्यामुळं आमदार बांगर यांचं आणि शासकीय कर्मचार्यांच काय भिनसल आहे; अशी चर्चा नागरिक करू लागले आहे.
तर आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचे असल्याचे बोले जात आहे. तसेच या विषयावर आमदार बांगर यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. नगृकांमधून'ही आमदार यांच्याविषयी संतप्त प्रक्रिया उमटू लागल्या आहेत.
No comments:
Post a Comment