Friday, January 20, 2023

पती सोबत पेठ बीड पोलिस ठाण्याकडे ड्युटीला जात असतांना अपघातात महिला पोलिस कर्मचार्‍याचे निधन.

बीड (प्रतिनिधी): पतीसोबत पेठ बीड पोलिस ठाण्याकडे ड्युटीला जात असतांना महिला पोलिस कर्मचारी यांच्या दुचाकीला टिप्परने जोराची धडक दिली होती. यामध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान महिला पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यु झाला.
माया जाधव या पेठ बीड पोलिस ठाण्यामध्ये महिला पोलिस म्हणुन कार्यरत होत्या. 2 दिवसांपुर्वी त्या ठाण्याकडे जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती होते. त्यांच्या दुचाकीला टिप्परने बार्शी नाक्याजवळ जोराची धडक दिली. यात पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान माया जाधव यांचे दु:खद निधन झाले.

No comments:

Post a Comment