बीड (प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शिवसेना व वंचित आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप व वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील,जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे जल्लोष केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती मुळे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा हृदयसत्कार करून शुभेच्छा दिल्या. व पुढील काळात बीड जिल्ह्यातील शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकसोबत घेऊन काम करू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,शिवसेना नेते शेख निजाम भाई,शिवसेना उप जिल्हाप्रमुख आशिष मस्के,युवासेना मा.जिल्हा युवा अधिकारी अभिजित बरिदे,शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघण,माजी सभापती सुनिल अनभूले,सुदर्शन धांडे,शहर प्रमुख सुनिल सुरवसे,शिवसेना युवा नेते नंदकिशोर पिंगळे,बबन वडमारे,वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता चक्रे, वंचित युवक जिल्हाध्यक्ष ,अनुरथ वीर,जिल्हा कोशाध्यक्ष अनंतराव सरवदे,एस ए.सोनवणे बालाजी जगतकर,वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष किरण वघमारे,शिवसेना उप शहर प्रमुख हानुप्रसाद पांडे,जयंत वाघ,राजेंद्र कोरडे ,शहराध्यक्ष लखन जोगदंड,पुष्पा तुरुकमारे,नंदा भंडारे ,राजकुमार जोगदंड,मिलिंद सरपते,श्रीकांत वाघमारे,अजय सरवदे,सुधीर कतले, धारूर चे तालुकाध्यक्ष इंजि.प्रशांत लहाने,अजय साबळे,सुमित उजगरे,श्रीकांत वाघमारे,ज्ञानेश्वर गिरी,भैय्या जावळे,सदाशिव सुर्वे,उमेश तुळवे यांच्यासह शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment