परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील माय छोटा स्कूलया शाळेत आनंदनगरी कार्यक्रमाच्या आयोजन आज दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री बाजीराव भैय्या धर्माधिकारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिया माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल गणी सर व अनिस खान सर, राज कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक हामेद राज, अश्पाक भाई, एनएच कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्रोफेसर सय्यद सादात सर , माय छोटा स्कूल परळीचे डायरेक्टर सय्यद विरासत सर व शेख आसिफ सर, यांच्यासह अनेक नागरिक व पालक उपस्थित होते.
लहान मुलांना व्यवहार,चलन,सामाजिक स्नेह या मूल्यांची ओळख अगदी प्रिस्कुल मध्येच होणे ही काळाची गरज आहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी घरून तयार करून आणलेले विविध खाद्य पदार्थ मटकीची, समोसा, उसळ,पावभाजी, ईडली, भेळ,पकोडे,यासह अनेक पदार्थ आजच्या आनंद नगरीचे आकर्षण ठरले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माय छोटा स्कूलचे शिक्षक व शिक्षिका संगीता जगतकर मॅडम, माधुरी सोलंकी मॅडम, खान खिजर सर व सानिया कुलसुम मॅडम, सेविका रूबिना यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment