आपल्या भावाला मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय जोगदंड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सहा भावांनी मिळून केलेल्या हल्ल्यात विजय यांचा मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी विजय जोगदंड यांचे बंधू नितीन जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्या. खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड या पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली
Thursday, January 19, 2023
बीड जिल्ह्याला हादरवणार्या जोगदंड हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात 2019 मध्ये गाजलेल्या भाजप नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड खून प्रकरणातील निकाल देतांना अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. विशेष म्हणजे या खटल्याकडे संपूर्ण अंबाजोगाई शहराचे लक्ष लागले होते. दरम्यान तब्बल चार वर्षांनी न्यायालयाने यावर निकाल दिला आहे. करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या भावांची नावं असून, राज जोगदंड अद्यापही फरार आहे.
आपल्या भावाला मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय जोगदंड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सहा भावांनी मिळून केलेल्या हल्ल्यात विजय यांचा मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी विजय जोगदंड यांचे बंधू नितीन जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्या. खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड या पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली
आपल्या भावाला मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विजय जोगदंड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सहा भावांनी मिळून केलेल्या हल्ल्यात विजय यांचा मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी विजय जोगदंड यांचे बंधू नितीन जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी या सर्व प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्या. खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी करण जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड या पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment