Thursday, January 19, 2023

मॉडेल कॉलेज मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चा २९ वा नामविस्तार दिन विविध उपक्रमांनी साजरा.


"सांस्कृतिक विभागाच्या वतीने निबंध, रांगोळी, तथा भीम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या"

*रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार इतिहास. 

घनसावंगी (प्रतिनिधी) येथील मॉडेल कॉलेज मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चा 29 वा नाम विस्तार दिन मोठ्या उत्साहाने, प्राचार्य डॉ. सतीश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16,17 जानेवारी रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने निबंध, रांगोळी, तथा भीम गीत गायन स्पर्धेने साजरा करण्यात आला. रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा इतिहास विविध रांगोळ्याच्या माध्यमातून प्रस्तुत केला. छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात असलेले संविधान आणि मशाल दाखवत समता एकता बंधुता चे प्रतीकात्मक रांगोळी काढण्यात आली. विद्यापीठाची कमान तसेच विविध प्रतीकात्मक रांगोळ्या विद्यार्थ्यांनी काढल्या. तसेच निबंध स्पर्धेमध्ये "मराठवाड्याच्या विकासामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची योगदान" या विषयावरती 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता तसेच भीम गीत गायन स्पर्धेमध्ये 15 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप प्राचार्य डॉ. सतीश दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.क न्नूलाल विटोरे ,प्रा. उदय पवार डॉ. ऋषी बाबा शिंदे यांच्या संयोजना खाली हा कार्यक्रम घेण्यात आला परीक्षक म्हणून श्री योगेश गायके, श्री मस्के, श्री गायकवाड, श्री उकांडे डॉ.बाळासाहेब सोनवणे डॉ.भीमराव पुंडगे डॉ. ज्ञानेश्वर खोजे ,प श्रीमती सपना देवकर, श्रीमती सुजाता जावळे यांनी काम पाहिले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment