दत्तात्रय राधाकिसन इंगळे वय 40 वर्षे, रा.हिवससिंगा हा पालवन चौकातील एका हॉटेलमध्ये नोकर म्हणुन काम करत होता. त्याचा मृतदेह आज सकाळी पालवन चौकातील एका झाडाच्या खाली ठेचलेल्या अवस्थेत दिसुन आला. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. एलसीबी आई फिंगर पथकही दाखल झाले होते. मजुराचा कोणी आणि कशामुळे केला असावा याचा तपास पोलिस करत आहेत.
No comments:
Post a Comment