जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जातात. या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकांना असलेले आजार, अपंग असल्याचे प्रमाणपत्र ज्याची माहिती आणि कागदपत्रे जोडावयाची असतात. बीड जिल्हापरिषदे अंतर्गत 336 शिक्षकांनी आपण अपंग असल्याचे अर्जामध्ये नमूद करून तसे प्रमाणपत्र जोडले होते. सीईओ पवार यांना याची शंका आल्याने गेल्या एक महिनाभरापूर्वी 336 शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, शिक्षण विभागाचे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचे सात पथके तयार करून या प्रमाणपत्राची पडताळणी केली होती. या पडताळणीमध्ये शंकास्पद आलेल्या शिक्षकांची फेरतपासणी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल बोर्डाकडे गेल्यानंतर 52 शिक्षक हे अपंगांच्या प्रमाणपत्रात बोगसगिरी करताना सिद्ध झाल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांची सुनावणी घेऊन त्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी तडकाफडकी निलंबीत केले. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहेे.
Monday, January 23, 2023
बीड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची कारवाई.52 अपंग शिक्षक निलंबीत.बोगस दिव्यांगांचे प्रमाणपत्र भोवले.
बीड (प्रतिनिधी) शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये 336 शिक्षकांनी अपंगांचे प्रमाणपत्र जोडून आपण ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत, त्या ठिकाणीच आपल्याला राहू द्यावे, बदली करण्यात येऊ नये, असा ऑनलाईन बदलीचा अर्ज भरला होता या 336 शिक्षकांचे अपंगांचे प्रमाणपत्र शंकास्पद आल्याने शिक्षण विभाग आणि जिल्हा रुग्णालयातील 7 वैद्यकीय अधिकार्यांच्या पथकाने यांची पुनर्तपासणी केली. त्यातील काही शिक्षकांना अंबाजोगाई येथील मेडिकल बोर्डाकडे पुनर्तपासणीसाठी पाठविले होते. या पुनर्तपासणीत 52 शिक्षकांचे अपंगाचे प्रमाणपत्राची टक्केवारी प्रचंड कमी आली, त्यात त्यांनी बोगसगिरी केली. याचा ठपका ठेवत आज मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या 52 शिक्षकांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment