Thursday, January 19, 2023

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा चे सुरक्षितता अभियान 25 जानेवारी पर्यंत चालणार - अजयकुमार मोरे

बीड (प्रतिनिधी) : बीड येथील एस.टी. महामंडळाचे सुरक्षितता अभियान 25 जानेवारी पर्यंत चालू राहणार सुरुवात दि. ११ जानेवारी. झाली आहे ते २५ जानेवारी या कालावधीत दरवर्षी प्रमाणे रा प महामंडळा  कडुन " सुरक्षितता अभियान " आयोजित करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही रा. प. बीड विभागाकडुन  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम सकाळी ११०० वाजता बीड बसस्थानकात घेण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. व कार्यक्रमाचे प्रस्तावीक बीड  आगाराचे आगार प्रमुख श्री. निलेश पवार यांनी केले. याप्रसंगी मा. श्री. लक्ष्मणराव राख, पोलीस  निरीक्षक, मा. श्री. कराळे साहेब, वाहन मोटार निरीक्षक, हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. श्री. अजयकुमार मोरे, विभाग नियंत्रक, हे होते. तसेच श्री. पन्हाळकर, यंत्र अभियंता, श्री. कराड. विभागीय वाहतुक अधिक्षक, श्री यादव, सुरक्षा व दक्षता अधिकारी तसेच इतर कर्मचारी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित होते..

याप्रसंगी राख साहेब कराळे साहेब यांनी उपस्थित कर्मचा-यांना वाहन चालविताना  घ्यावयाची काळजी यावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच अपघात टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे अवाहन केले. श्री. मोरे यांनी मागील ०४ वर्षाच्या अपघातांच्या तुलनेत २०२२ मध्ये रा. प.चालकांकडुन कमी अपघात झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. व अशीच चांगली | कामगिरी भविष्यात रा प कर्मचा-यांकडुन होईल, अशी ग्वाही रा प कर्मचा-यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना देण्यात आली.सांगता केली.कार्यक्रमाच्या शेवटी, श्री. कराड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. 

No comments:

Post a Comment