परळी वैजनाथ (प्रतिनीधी ) तमाम माळी समाजाला एकसंघ करुण समाजातील सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणीक व राजकीय परिसाथीती सुधारुण माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अवीरत संघर्ष करणार्या सावता परिषदेच्या वतीने सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत नवनिर्वाचीत सरपंच व ऊपसरपंचाच्या सत्कार सोहळयास मोठयासंखेने ऊपस्थीत रहावे असे आव्हाण सावतामाळी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते राजकुमार डाके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सबंध माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सावता परिषद आयोजीत संस्थापक अध्यक्ष मा.कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षते खाली बीड जिल्हयातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वञीक निवडणुकीत बीड जिल्हयामध्ये माळी समाजातुन निवडुन आलेल्या सर्वपक्षीय सरपंच व उपसरपंचांच्या भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन आज शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी हाॅटेल यशोदा, बार्शिरोड बीड येथे ठीक १२ वाजता आयोजीत करण्यात आला असुन या सत्कार सोहळयातील नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंचांना आशिर्वाद देण्यासाठी श्री संतश्रेष्ठ सावता महाराजांचे १७ वे वंशज श्री ह.भ.प. रमेश महाराज वसेकर हे उपस्थीत राहाणार असुन या सोहळयास मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतीथी म्हणुन कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुरजी वैद्य, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.मनिषाताई सोनमाळी, मराठवाडा अध्यक्ष शिवानंदजी झोरे, यांच्यासह विशेष निमंञीत म्हणुन औरंगाबादचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सुनिलजी भोकरे, बीडचे निवासी उपजिल्हाधीकारी मा.संतोषजी राऊत, बीड जिल्हा कृषीअधिकारी मा.बाबासाहेब जेजुरकर, बीडजिल्हा नियोजन अधिकारी मा.सुधाकरजी चींचाणे, बीडचे माध्यमीक विभागाचे शिक्षणाधिकारी मा.नागनाथजी शिंदे, बीडचे पोलीस निरीक्षक मा. शितलकुमार बल्लाळ, पाटोद्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सदाशिव राऊत, बीडच्या उमेद व्यवस्थापक कु.ञिवेणीताई भेंडे यांच्यासह मा.जगण काळे, पल्लवीताई धोंडे, अजयजी धोंडे, लक्ष्मणराव ढवळे, नामदेवराव दुधाळ, सुधाकरराव वादे, डाॅ.राजीवजी काळे, विनीतजी गोरे, विष्णुपंत खेञे, संदीपजी अस्वर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन या नवनिर्वाचीत सरपंच उपसरपंचांच्या भव्यदिव्य सत्कार सोहळयास सर्व माळी समाज बांधवांनी मोठया संखेने ऊपस्थित राहाण्याचे आव्हान सामाजीक कार्यकर्ते तथा सावता माळी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार डाके यांच्यावतीने करण्यात आले.
No comments:
Post a Comment