Monday, January 9, 2023

श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे यांचे दुःखद निधन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे यांचे आज सोमवार दि.9 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 65 वर्ष वयाच्या होत्या. मनोज चौंडे व महेश चौंडे यांच्या त्या आई होत. 
परळी येथील श्रीमती वत्सलाबाई माणिकअप्पा चौंडे रा.गोपनपाळे गल्ली यांचे आज सोमवार दि.9 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वीरशैव समाज स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. वीरशैव समाज आयोजित विविध धार्मीक व सामाजिक उपक्रमात त्या सहभागी होत असत. अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. अज्ञानबोधिनी विद्यालयाचे शिक्षक मनोज चौंडे व उप पोस्ट मास्तर परळीचे महेश चौंडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चौंडे कुटूंबियाच्या दुःखात दै.कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे. 

No comments:

Post a Comment