श्रीरामपूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी साहेब.भाग श्रीरामपूर यांना गौसे आजम सेवाभावी संस्था बेलापूर च्या पदाधिकारी कडून शहर व तालुका मध्ये चायना मांजा वापरावर बंदी घालावी यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात सांगितले की आम्ही गौसे आजम सेवाभावी संस्था बेलापूर या संस्थेचे पदाधिकारी असून आम्ही सामाजिक प्रश्न सोडविणेसाठी नेहमी प्रयत्नशिल असतो कायद्याचा अनादर करणा-यांवर कारवाई व्हावी म्हणून शासनदरबारी प्रश्न मांडून ते सोडवितो व समाजकार्य करत आहोत..जानेवारी महिन्यात येणा-या मकर संक्रांत सणाचे वेळी मोठया प्रमाणात पतंगबाजी चालू असते अनेक तरुण, अबालवृध्द पतंगबाजी करीत असतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून पतंगबाजीसाठी चायना मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून यापासून मानवाचे जिवीतास मोठा धोका निर्माण झालेला आहे जमिनीवरच नाहीतर तर आकाशात उडणा-या पशुपक्षांचे पंखांमध्ये हा चायना मांजा अडकून अनेक पशुपक्षी यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत तसेच या चायना मांजामुळे रस्त्यावरून जाणारे येणारे वाहनधारकांच्या मानेस हा मांजा अडकून मोठया प्रमाणात अपघात घडून वाहनधारकांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती झालेल्या असून यामध्ये अनेकांचा जीवही गेलेला आहे. वारंवार शासनाकडून आवाहन केले जाते की चायना मांजाची विक्री करु नका, वापर टाळा परंतु याकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही सर्रासपणे अनेक ठिकाणी चायना मांजाची मोठया प्रमाणावर विक्री होत आहे परंतु पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अनेक बालके, शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनायावेळी जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते. शासनाचे नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले. जात असून चायना मांजाचा वापर चालूच आहे. तरी आम्ही आपणास या निवेदनाद्वारे कळवितो की, आता पुन्हा या महिन्यात मकर संक्रांत सण साजरा होत आहे तरी आपण यावेळी संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांना चायना मांजा विक्री करु न देणेबाबत कार्यवाही करावी तसेच या चायना मांजा विक्री पूर्णपणे कायमस्वरुपी बंदी घालावी याउपरही जर कोणी विक्रेता कायदयाचे उल्लंघन करून चायना मांजा विक्री करीत असेल तर त्याचेविरुध्द कडक कायदेशिर कारवाई करावी यावेळी गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख़्तार सय्यद,अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव, नौशाद शेख,जिल्हाध्यक्ष मुनवर शेख़ उपस्थित होते
No comments:
Post a Comment