अंबाजोगाई ( प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२४ मार्चच्या रात्री देशात लॉकडाऊनची घोषणा केेली आहे. त्यामुळे देशासह राज्य व शहराशहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असाच बंदोबस्त अंबाजोगाई शहरात देखील ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तावरील पोलीसांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड होऊ नये म्हणून पुरोगामी पत्रकार संघ अंबाजोगाई कडून पाण्याच्या जार ची सोय करण्यात आली .
जगात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. हा कोरोना विषाणू भारतात ही आला असून आतापर्यंत देशात २५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून केंद्र व राज्य शासन विविध उपाय योजना करीत आहेत. त्यातंर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कलम १४४ लागू करून संचारबंदीची घोषणा केली. देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशात लाँकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे शहराशहरातील पोलिस दलाची ड्युटी व काम वाढले आहे.शहरात पोलीस, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुरोगामी पत्रकार संघ अंबाजोगाई कडून अखंडितपणे सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचारी बांधवाना नेमून दिलेल्या पॉईट जाऊन पिण्याच्या पाण्याच्या जार ची सोय करण्यात आली पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण लॉक डाऊन संपेपर्यंत पिण्याच्या पाण्याचे जार पुरोगामी पत्रकार संघ अंबाजोगाईच्या वतीने दररोज सकाळी देण्यात येत आहेत अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली आहे, यावेळी अंबाजोगाई पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय जोगदंड शहराध्यक्ष अशोक दळवे, तालुका सचिव अतुल जाधव,ता संघटक श्रीकांत कदम, कोषाध्यक्ष शेख युनूसभाई, पुरोगामी संघाचे सदस्य पेपर विक्रेते सातपुते व पोलीस कर्मचारी बांधव दिसत आहेत.
No comments:
Post a Comment