* ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी व परिवाराचे सामाजिक कृत्तज्ञता.
परळी वैजनाथ;- येथील गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा जुन्या पिढीतील जेष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांच्या पत्नी सौ.इंदुबाई जोशी यांचे दि.२ रोजी निधन झाले होते.क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आपत्ती प्रसंगी सामाजिक भान राखून आपल्या आईच्या जोड जेवणावर होणारा खर्च कोरोना ग्रस्तांसाठी च्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा केला आहे.
या परिवारावर कोसळलेल्या दुःखात ज्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेजद्वारे संवेदना व्यक्त केल्या त्यांचे जोशी परिवाराने ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत ऋणनिर्देश व्यक्त करताना सामाजिक भान जपण्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.आज त्यांच्या स्व. आईचा चौदावा दिवस आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गंगापूजनाचा ( गोड जेवणाचा / उत्तर कार्य ) कार्यक्रमाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला देण्याचा निर्णय जोशी कुटुंबीयांनी घेतला आहे.
प्रशांत जोशी हे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री बीडचे पालकमंत्री नाना धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेले अनेक वर्ष काम करतात सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना सामाजिक जाणिवा घट्ट असल्याने त्यांनी देशात कोणामुळे निर्माण झालेल्या या विपरीत परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबियांवर कोसळलेले दुःख बाजूला सारत व पारंपारिक गोष्टींना फाटा देत सामाजिक उत्तरदायित्व महत्वाचे समजत समजून आपल्या आईच्या गोड जीवनावर होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला व सामाजिक भान राखण्याचे आदर्श उदाहरण दाखवून दिले आहे.
No comments:
Post a Comment