बीड ;-जिल्ह्यातील बँकांचे कामकाज व वेळांमध्ये बदल करण्यात येत असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश नुसार ७ एप्रिल २०२० पासून हे बदल करण्यात आले आहेत असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षे्त्रिय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी कळविले आहे.
बीड, माजलगाव अंबाजोगाई व परळी या चार नगर परिषद शहरां मध्ये विषम दिनांक 7, 9, 11 व 13 या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहतील बीड, माजलगाव अंबाजोगाई व परळी या चार नगर परिषदांची हद्द वगळता उर्वरित जिल्ह्याच्या भागांमध्ये सम दिनांक जसे 8, 10, 12 व 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. तसेच जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व ग्राहक सेवा केंद्र त्यांच्या कार्यक्षेत्रात रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिलेल्या आदेशाचा अधीन राहून व सर्व प्रकारची काळजी घेऊन कार्यरत राहतील.
No comments:
Post a Comment