Tuesday, April 7, 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परळी शहरात पोलिसांचे शर्यतीचे प्रयत्न.

परळी वैजनाथ ;- परळी वैजनाथ बीड जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या सूचनेनुसार पोलिस प्रशासन चांगल्या पद्धतीने लाॅक डाऊनची परिस्थिती हाताळत आहेत. संचारबंदी शिथिल कालावधी वगळता इतर वेळी परळीतील सर्वच रस्ते निर्मनुष्य असतात. अत्यावश्यक सेवेतील खाजगी दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्वत्र बंद शांततेत चालू आहे. शहर, ग्रामीण, संभाजीनगर तसेच सिरसाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा नागरी संसर्ग टाळण्यासाठी 24 तास कार्यरत आहेत. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत असून नागरिकही पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे

No comments:

Post a Comment