Monday, April 20, 2020

सोनाली फर्निचर च्या कपाट गोडाऊनला भीषण आग.

* आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात.

परळी वैजनाथ ;- परळी शहरातील दत्त मंदिर ट्रस्ट जागेत किरायाने असलेले अनिल जाधव यांचे सोनाली फर्निचर अँड उडन फर्निचर या गोडाऊनला भीषण आग लागली सकाळी 11 30 च्या दरम्यान अचानक लागलेली या आगीने गोडाऊन मधील फर्निचर ला कलर करणारी भट्टी व पेंट ड्रम हे सर्व आगीत भस्म झाले असल्याचे दिसले परंतु ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण मात्र अद्यापही गुलदस्तात बंद आहे.
या वेळी आग लागल्या ठिकाणावरून अग्नी क्षामक दल यांना शहरातील एका व्यक्तीने सांगितले त्या क्षणी अग्नी क्षामक बंब या ठिकाणी पहोंचले परंतु मोठ्या कसरतीने सुनील रोडे यांनी तब्बल 35 मिनिटात आग आटोक्यात आणली परंतु या वेळी आग लागल्या ठिकाणी ही आग विद्युत पुरवठा ने लागली असे दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असून सुद्धा सदर गोडाऊन चालू असल्याने मा. जिल्हाधीकारि यांच्या आदेशास डवलून चालू ठेवला अशी चर्चा प्रत्येक दर्शीने तिथे सुरू होती.
वारंनवार नगरपरिषदेने त्या गोडाऊन मालकाला नोटीस बजावली की तुम्ही कायदेशीर परवाने घ्या व नियम पाळा या करिता कादेशीर नोटीस दिले असून देखील या नोटीस न पाहता कारागिरांच्या जीवाची पर्वा न करता आवश्यक असणारे आग विझवण्याचे यंत्रणा कोणतीही या ठिकाणी आढळून आली नाही.

No comments:

Post a Comment