Saturday, April 11, 2020

३०० रुपयांत मिळवा पोलिसांची बनावट पास.आणी कुठेही करा टायमपास.

माजलगांव, प्रतिनिधी – प्रशासनाने आवश्यक आहे तिथेच व त्यांनाच तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालवण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून विशिष्ट पास तयार केली आहे. पण हिचहुबेब पास फक्त तीनशे रुपयात विकत घ्या आणि मुक्त संचार करा.असा अफलातून धंदा करणाऱ्या तरुणाला फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
कोव्हिड -१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊनच असून संचारबंदी मध्ये जिल्हा अंतर्गत फिरण्याकरिता अत्यावशक सेवेसाठी बीड जिल्हा पोलिसांनी आॅनलाईन पास उपलब्ध केल्या आहेत. परंतु अशा पास मधुन अक्कल हुशारीने अतिकर्तबगारी करून माेबाइलच्या सहाय्याने छेडछाड करत नाव व गाडी नंबर बदलत बेलुरा येथील महेश अशोक फपाळ (वय २१ वर्ष) हा तरुण बनावट पास बनवत ३०० रुपयात विक्री करत होता. याचा सुगावा बेलुरा येथीलच देसाई मोतीराम फपाळ या जागृताला लागण्याने त्यांनी दिंद्रुड पोलिसात तक्रार करत सदर गुन्ह्याची माहिती दिली असता दिंद्रुड पोलिस स्टेशनचे सपोनि आनिल गव्हाणकर यांनी सदर तरुणास तात्काळ अटक करत मोबाईल जप्त केला असुन आरोपी महेश अशोक फपाळ याने किती जणांना बनावट पास बनवुन दिला आहे याचा तपास करीत असल्याचे सांगितले. दरम्यान देसाई मोतीराम फपाळ याच्या फिर्यादी वरुन गु.र.नं.वरुन ७८/२०२० भादंवि. कलम ४२०,४६५,४६८ अन्वये महेश फपाळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारच्या बनावट पासेस वरुन जिल्हा प्रशासन आणि संबंधीत ठिकाणी असलेले प्रशासन यांच्या ताणतणावात आणखी भर पडली आहे हे मात्र निश्चित झाले आहे

No comments:

Post a Comment