Wednesday, April 8, 2020

पत्रकार आणि वृत्तपत्र माध्यमातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक किराणा राशन चे वितरण होणार ;- वैभव स्वामी

बीड ;-  प्रतिनिधी बीड शहरातील विविध वर्तपत्रामधील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार तसेच कॅमेरामन,ऑफिस बॉय, ऑपरेटर,मशीन ऑपरेटर,पेपर विक्रेते,एजंट आणि पेपर लाईन करणारी मुले यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने मोफत राशन लवकरच देण्यात येणार आहे. ज्या गरजूवंतांना राशनची खरी गरज आहे अशाच व्यक्तीने संपर्क साधावा असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.                                     महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा शाखेने इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील गरजूवंतांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे.माध्यमातील पत्रकार,प्रेस फोटोग्राफर,ऑपरेटर,ऑफिस बॉय,वसुली प्रतिनिधी, व्यवस्थापक,मशीन ऑपरेटर, पेपर विक्रेते एजंट आणि पेपर लाईन करणारी मुले या घटकांमधून ज्यांना राशनची खरी गरज आहे अशाच गरजूवंतांनी संपर्क साधावा आणि आपली नोंद पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव मोबाईल नंबर 98 81 42 42 86 या वर संपर्क करून दोन दिवसात नोंद करावी. यानंतर गरजूवंतांना घरपोच अत्यावश्यक राशन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी जाहिर केले आहे.

No comments:

Post a Comment