Tuesday, April 7, 2020

सोशल डिस्टसिंगचा नागरीकाकडुच फज्जा.

* बॕक व ग्राहक सेवा केंद्रावर नागरिंकांची गर्दीच गर्दी.

परळी वैजनाथ ; कोरोनाच्या संसर्गाचा धसका अख्ख जग घेत असतांना परळीत राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात असलेल्या इंडिया बॕक,व ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम काढण्यासाठी महीलांची व पूरूषांची तसेच रोजच्या अत्यावश्यक किराणा वस्तू भाजी पाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांगाची प्रचंड गर्दी केली आहे.सोशल डिस्टसिंगचा नागरिकांकडुनच फज्जा उठवला जात आहे.
दरम्यान केंद्र सरकारच्या वतिने जन धनच्या बॕक खात्यात 500 रुपये वर्ग करण्यात आल्याने हे नागरिक पैसे काढण्या साठी बॕकेसमोर जमाझाले असुन बंदोबस्तात असलेली पोलिसही चक्राहुन गेल्याचे दिसत आहे या गर्दीचे करायच तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलिस अधिक्षक हर्ष पोदार हे जिल्ह्यात अतिषय चोक नियोजन करत आहेत.त्यांच्या कामाच कौतुक ही संबध जिल्हाभरात होत आहे.
परळीतील नागरिकांनी थोड जागरूक होऊन प्रशासनाचे आदेश पाळणे  गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment