Tuesday, April 7, 2020

केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य; - राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

मुंबई ;- करोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय आज (मंगळवार) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय :

१. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.

२. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.

३. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.

४. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.

No comments:

Post a Comment