परळी वैजनाथ ; राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी महाडिक साहेब आणी तहसीलदार डॉ.विपीन पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन सनियंत्रण समितीच्या आजच्या बैठकीतील झालेले प्रमुख निर्णय.
* फळे व भाजीपाला विक्रेत्या परवानाधारकांना प्रभागनिहाय तसेच परळीच्या हद्दीबाहेरील परीघस्त क्षेत्रात विभागून देण्यात येणार.
* तालुक्यातील दूध उत्पादक तसेच खवा उत्पादक यांना प्रभागनिहाय विक्री साठी परवाने देण्याचा निर्णय.
* मासेविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना फिरुन मासेविक्री आणि प्रोन्सविक्रीचे परवाने देण्याचा निर्णय.
* शहरातील मोकाट जनावरांना जमा करुन परिसरातील गोशाळेत दाखल करण्याचा निर्णय.
* संचारबंदी काळात अंत्यविधीसाठी गरजू नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने तात्काळ निधी देण्याचा निर्णय.
* बाहेरुन आंबे आणी द्राक्ष आणून विक्री करणाऱ्या शेतीगट,बचतगट बेरोजगार संस्था,व्यापारी यांना परिवहन परवाने देण्याचा निर्णय.
* शहरात प्रभागनिहाय किराणा दुकानदारांना घरपोच किराणा साहीत्य देण्यासाठी परवाने देण्याचा निर्णय.
*100 डबे पुरविण्याची क्षमता असणारे शिवभोजन योजनेचे पात्र ठरलेले तीन केंद्र शहरात तात्काळ सुरु करण्याचा निर्णय.
* शहरातील बँक व विविध पतसंस्था यांना बॅंक टाईम कालावधीचे ओळखपत्रे देण्याचा निर्णय.
*केशकर्तनालय बंद असल्यामुळे व्यावसायिकांना घरपोच सुविधा देण्यासाठी परवाने देण्याचा निर्णय.
* मातीचे माठ,रांजण विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय.
* पाणीटंचाई होवू नये म्हणून नवीन बोअरवेल घेणे आणी दुरुस्ती करण्यासाठी नाहरकत.
यासह लोकोपयोगी आणी गर्दी टाळण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.।
No comments:
Post a Comment