Monday, April 6, 2020

निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: अन्यथा कारवाई करण्यात येईल;-जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

बीड, दि ६: दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज व उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा यासह देशाच्या इतर भागात झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या व तेथे जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने  येत्या 24 तासात माहिती द्यावी. आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी यासाठी  त्यांनी 02442- 222604 या हेल्पलाईन वर स्वतःहून  संपर्क साधावा  यासाठी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. यासाठी प्रशासनातर्फे त्यांना योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल कोरणा विषाणू प्रतिबंध हाच उपाय असल्याने आपले कुटुंबीय आपले मित्र परिवार समाज गाव हे या संसर्गापासून वाचवण्यासाठी सहकार्य करावे जमात या कार्यक्रमात आपण सामील झाले होते ही माहिती आपण लपवून ठेवली व पुढे भविष्यात बाधित आढळून आल्यास जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणा विरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम 269, 270 व 188 नुसार कारवाई करण्यात येईल.
 या मेळाव्यात परदेशातील इंडोनेशिया मलेशिया व विविध देशातील यातील अनेकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे .    जमात या कार्यक्रमातून आल्यानंतर काही नागरिक जिल्ह्यात  थांबले असण्याची शक्यता आहे  त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की  आपल्या परिसरात गावात  अश्या कोणी व्यक्ती असतील तर त्यांनी संपर्क साधून प्रशासनास माहिती द्यावी.

No comments:

Post a Comment