Thursday, April 9, 2020

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालया च्या एच.आय.व्ही. डायग्नोस्टीक लेबोरेटरीला “एनएबीएल”चे नामांकन.


बीड:अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एचआयव्ही डायग्नोस्टीक लायबोरेटरीला “एनएबील” या संस्थेचे नामांकन प्राप्त झाले असून एनएबीएल या संस्थेच्या संचिलिका एस गायत्री यांनी याबध्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व टीमचे विशेष आभिनंदन केले आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाची एचआयव्ही डायग्नोस्टीक लायबोरेटरी ही राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असणाऱ्या लायबरोटरीपेक्षा अधिक सक्षम व कार्यक्षमतेने काम करणारी लायबोरेटरी आहे. या लायबोरेटरीही (एसआरएल) स्टेट रेफरन्स लायबोरेटरीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्य करीत होती. या लायबोरेटरीस (एनएबीएल) नँशनल अँक्रिडेशन बोर्ड फाँर टेस्टींग अँड कँलिब्रेशन लायबोरेटरीज या संस्थेने आयएसओ १५१८९ : २०१२ नुसार संलग्नता दिली आहे.
स्वाराती च्या या लायबोरेटरी मध्ये एचआयव्ही रुग्णांच्या रक्त नमुन्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवण्यात आलेल्या सर्व निकषांचे पालन करुन चाचण्या करण्यात येतात. व यासाठी लागणारी अत्यावश्यक गुणवत्ता, दर्जा व क्षमता तसेच आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या सर्व बाबींचा विचार करून आयएसओ १५१८९:२०१२ च्या निकषानुसार पाहणी करुन नँशनल अँक्रिडेशन बोर्ड फाँर टेस्टींग अँड कँलिब्रेशन लाबोरेटरीज यांनी हे नामांकन दिले आहे.

No comments:

Post a Comment