Monday, April 6, 2020

कोरोनाच्या संकटकाळी भगवान पौळ यांच्याकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणुचा सध्या मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अतिशय प्रभावी प्रयत्न करीत आहेत. आपण संकटाला सामोरे जात असतांना या संकटकाळी रामेवाडी येथील भगवान पौळ यांनी 1010 रूपयांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा केली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,घरात रहा सुरक्षित रहा,शासनास सहकार्य करा असे आवाहन भगवान पौळ यांनी केले आहे. 
       देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या 21 दिवसांचे लाँकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटक पुढे येत आहेत. परळी तालुक्यातील रामेवाडीचे भगवान पौळ यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ साठी एक हजार दहा रूपयांची मदत खात्यात जमा केली आहे.  कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहेत. या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. तसेच कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना करिता आहेत. महाराष्ट्र शासन  कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहे, या प्रयत्नांना साथ देण्यासाठी मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19 बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720, स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300, आयएफएससी कोड SBIN0000300 या खाते क्रमांकावर  सढळ हाताने मदत करा उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये,घरात रहा सुरक्षित रहा,शासनास सहकार्य करा असे आवाहन भगवान पौळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment