Saturday, April 11, 2020

पॕराडाईज हॉटेलच्या मागच्या दाराने दारू विक्री.विकत घेणार्‍यासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

अंबाजोगाई (प्रतिनीधी ):- शहरातील हॉटेल पॅराडाईडजमधून मागच्या दारातून दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याठिकाणी पो. ना.तानाजी तागड यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी  त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी दारू घेऊन जाणार्‍या एकाला ताब्यात घेतले असून मालकासह त्याच्याविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 शहरातील पॅराडाईज हॉटेल येथे मागच्या दारातून दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठार्‍याचे बीट क्र. 4 चे अंमलदार सोळंके यांच्यासह पो. ना.तानाजी तागड, पोह. घोलप, पोह. तिडके यांनी हॉटेल पॅराडाईज येथे छापा मारला असता अक्षय लिंबराज लंगे (वय 28, रा. गणेशनगर अंबाजोगाई) याला दारूच्या बाटल्या घेऊन जात असताना  पकडले तर हॉटेलचा मालक देशमुख व मॅनेजर किशोर बलसुकर यांच्याकडून त्यांनी या बाटल्या खरेदी केल्याची कबुली दिली. यावरून अंबाजोगाई पोलिस ठाण्यात सपोनी रोहित गंगाधर बंबरे यांच्या फिर्यादीवरुन अक्षय लिंबराज लंगे, पॅराडाईजचे मालक देशमुख व हॉटेल मॅनेजर किशोर बलसुकर याच्या विरोधात 144, 270, 188, 269 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्णयघात आला आहे.

No comments:

Post a Comment