Friday, April 10, 2020

परळीत बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त.

* राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्याच्या अतिशय भयानक वातावरणातही शहराच्या अशोक नगर भागात बनावट दारू तयार करण्याचा सुरू असलेला कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (शुक्रवारी) सकाळी उद्ध्वस्त केला. याप्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, परळी येथील अशोक नगर भागात बनावट दारु निर्मिती केली जाते अशी माहिती बीडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यावरून विभागाचे अधिक्षक धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. एम. पठाण, आर. डब्ल्यू. कडवे, दुय्यम निरीक्षक एस. आर. आल्हाट, आर. ए. घोरपडे, ए. एन. पिकले,
जवान बी, के, पाटील, सादेक अहमद, के. एन. डुकरे, आर. ए. जारवाल, एन. बी. मोरे, के. एस. जारवाल यांनी आज दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याचे सुमारास घटनास्थळी अचानक धाड टाकली. यावेळी बनावट दारुच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या व दारू बनवण्यासाठी लागणारे केमिकल, आदी साहित्य जप्त केले.
राज्य उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांनी माहिती देतांना सांगितले की, दोन दिवसापुर्वी अज्ञात खबरीने दिलेल्या माहितीनुसार याची पडताळीणी करण्यासाठी आज शुक्रवार दि.10रोजी सकाळी अचानक अशोक नगर येथील पिंटु देवडे यांच्या घरी चौकशी व झाडाझडती केली असता काहीही मिळुन आले नाही परंतु पिंटु देवडेच्याच घराच्या मागे तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला असुन मॕकडाॕल,आयबी आदी कंपनीच्या बनावट दारुच्या बाटल्या मिळुन आल्या. दरम्यान लाॅक डाऊन आणि संचारबंदी असतानाही हा कारखाना बीनबोभाट चालू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment