*दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या श्रीराम कथेस सहाव्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी.
लातूर (प्रतिनिधी) गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति जाग्रति संस्थान लातूर शाखेच्या वतीने ५ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान श्री मारवाडी राजस्थानी शाळेच्या पाठीमागील ग्राउंडमध्ये सात दिवसीय भव्य श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या सहाव्या दिवशी सुश्री श्रेया भारतीजी यांनी श्रीराम भक्त हनुमान याचा लंका प्रवेश माता सीतेचे दर्शन इत्यादी विषयी देताना भाक्तीगीताच्या माध्यमातून रोमहर्षक वातावरण निर्मिती केली.तसेच संस्थेबद्दल माहिती देताना साध्वी श्रेया भारती जी म्हणाल्या की, सर्वश्री आशुतोष महाराजजी यांनी पंजाबमध्ये अशा वेळी संस्थेची सुरुवात केली, जेव्हा सर्वत्र दहशतवाद पसरला होता. त्यावेळी मोजक्या लोकांपासून सुरू झालेल्या या संस्थेने आज जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे, ज्याचे करोडो अनुयायी आहेत. दिव्य ज्योति जाग्रति संस्थेचे उद्दिष्ट धर्माला व्यवसाय बनवणे हा नसून ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार-प्रसार करणे हा आहे. कारण धर्म हा कर्तृत्वाचा विषय नसून तत्वज्ञानाचा विषय आहे.
सुश्री श्रेया भारतीजी सांगितले की, संस्थेतील हजारो युवक सर्वस्वाचा त्याग करून केवळ समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहेत, जे सुशिक्षित व साधनसंपन्न कुटुंबांतील आहेत. हे सर्वजण ब्रह्मज्ञानाची मशाल घेऊन विश्वशांतीचा संकल्प सार्थक करण्यासाठी सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करत आहेत.सध्याच्या समाजातील अशांततेचे मूळ कारण मानवी मनाची अस्वस्थता आहे आणि हे मन शांत करण्यासाठी मानवाला दैवी ज्ञानाची नितांत गरज आहे. जेव्हा मानव नैसर्गिक आनंदात येईल तेव्हाच समाज, राष्ट्र आणि जागतिक शांतता प्रस्थापित होईल. आज जागतिक शांततेची पताका फडकवणारी संस्था आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही पूर्णपणे कार्यरत आहे.संस्थेतर्फे अनेक अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांद्वारे समाजात चेतना पसरवली जात आहे, हे एक आगळेवेगळे उदाहरण आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक तथ्यांनी भरलेली ही अनोखी आणि रंजक कथा ऐकून भगवान भक्तांना आनंद झाला.
साहव्या दिवशी च्या कथेसाठी प्रमुख अतिथी म्हणून संजय बनसोडे , माजी गृहराज्यमंत्री, हरिभाऊ गायकवाड, श्री पोटे, सौ.वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.लातूर, श्री.व सौ.हरीश काळे ना. तहसीलदार जि.का.लातूर , श्री व सौ बोरुडे, सौ.तृप्ती अंधारे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), श्री.अरुण आकडे, श्री व सौ दत्तात्रय मोरे, श्री विजयकुमार पिनाटे , सौ.मीराबाई गोमसाळे, श्रीमती कदम मॅडम, श्री हरिश्चंद्र कोंबडे, श्री बाबुराव येलमत्टे, श्री गोविंदराव गंजेवार , डॉ.श्री.व सौ. पाचेगावकर, श्री श्रीकांत रांजणकर,सौ. पूजा शेळके, श्रीमती नोकाजा, श्री. बिराजदार, श्री व सौ गंभीरे, श्री मोहन बुके,श्री.वैजनाथ व्हत्ते इ. शेवटी पावन पुनीत आरतीने श्रीराम केथेच्या सहाव्या दिवसाची सांगता झाली.व श्री नवनाथ क्षीरसागर भारती ज्वेलर्स लातूर यांच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला.
No comments:
Post a Comment