बीड;-(प्रतिनीधी ) बीड शहरातील सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत करोडो रुपये आले आहेत व ते करोडो रुपये खर्चही झाले आहेत तरीसुद्धा बीड शहरातील एकही रास्ता एक ही नाली स्वच्छ आणि सुंदर दिसायला तयार नाही ‘स्वच्छ व सुंदर शहर’च्या नावाखाली नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाने नेहमीच फसवणूक केली आहे बीड शहरातील विकास कामाच्या माध्यमातून गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून कोणताच विकास सर्वसामान्य जनतेला दिसायला तयार नाही विकासाची दिंडोरी मात्र नगराध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते पालिका प्रशासन सातत्याने कागदोपत्री दाखवून करोडो रुपये लाटण्याचे काम करत आहेत बीड शहरातील कोणत्याही भागातील कोणत्याही प्रभागातील एकही रस्ता आणि नाली जी पूर्णत्वाकडे नेली आहे याची माहिती पालिका प्रशासनाने नगराध्यक्षांनी द्यावी गल्लो गल्ली साचलेल्या कचर्यांचे ढगाने दुर्गंधीयुक्त शहर झाला असताना कोणत्याही भागामध्ये सफाई कामगार वेळेवर जात नाहीत साफ स्वच्छता वेळेवर होत नाही स्वच्छतेच्या नावाखाली दरवर्षी करोडो रुपयांचे टेंडर गुत्तेदार यांच्या घशात घालण्याचे काम स्वतःला प्रत्येक कामात टक्केवारी मिळावी म्हणून हे पालिका प्रशासनातील कर्मचारी अधिकारी नगराध्यक्ष संगनमताने बीड शहरांच्या विकासासाठी आलेल्या निधींचा लुटा करताना दिसत आहेत बीड शहरातील या अगोदर आलेल्या निधीमधून जे प्रलंबित कामे आहेत ते कामे अर्ध्यावर सोडून बीड शहरातील एकही रस्ता एकही नाली पूर्ण नाही स्वच्छतेच्या नावाखाली शहराचं वाटोळं करून टाकला आहे अर्धवट रस्त्यावर पेवर ब्लॉक लावायचे राहिले आहेत रस्ते च्या ठिकाणी अर्धा रस्ता अंडरग्राउंड ड्रेनेजच्या नावाखाली उघडून ठेवला आहे वास्तविक अंडरग्राउंड ड्रेनेज ची सुरुवात कुठून होते व कुठे संपते पालिका प्रशासनाने एकदा सांगावे ४५० कोटी रुपये विविध विकास कामांचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री व माजी पालकमंत्री यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण याठिकाणी मोठ्या थाटामाटात मध्ये उद्घाटन समारंभ पार पडला होता त्या ठिकाणी माजी मंत्री बीडचे नगराध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते तरीसुद्धा पुन्हा पुन्हा उद्घाटन करण्याचा नगराध्यक्षांचा छंद मात्र बीडच्या सर्व जनतेला माहित आहे अशा खोट्या व बोगस उद्घाटनामुळे आश्वासनामुळे घरातील मंत्री असलेले माजी मंत्री झाले त्यानंतर आमदार आणि आता माजी आमदार झाले आहेत जर अशाच पद्धतीने बोगस विकासाचा शुभारंभ करत राहिले तर २०२१ ला नगरपालिका निवडणुकीत बीड शहरातील सुज्ञ मतदार तुम्हाला सुद्धा घरी बसल्याशिवाय राहणार नाही याचे तरी भान नगराध्यक्ष ठेवावं घरांमध्ये राहिलेले एक पद तेही अल्पशा मताने निवडून आले आहेत जर याच पद्धतीचा विकासाचा देखावा केला तर तुम्हाला परवा असून कोणीही थांबवू शकत नाही स्वच्छ व सुंदर शहराच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली जवळच्या गुन्हेगारांना पाठीशी घालून करोडो रुपयांच्या विकास कामाची लूट आपल्या माध्यमातून दिवसाढवळ्या होत आहे. नवगण कॉलेज ते पालवन चौक या रस्त्याचा सुद्धा आतापर्यंत तीन वेळेस उद्घाटन माजी आमदार व नगराध्यक्ष यांच्याहस्ते झाला आहे तर एकदा स्वयंघोषित राष्ट्रीय नेते आमदार विनायक मेटे यांनी सुद्धा या श्रेया वादाच्या लढाईमध्ये आपल्या हाताने उद्घाटन करून घेतले होते परंतु दोन वर्ष झालं अद्यापही त्या रस्त्याचं काम काम सुरू झालं नाही.
भर दुष्काळामध्ये बीड शहर सर्वत्र लोक डाऊन आहे अशा परिस्थितीमध्ये दोन्ही धरणांमध्ये माजलगाव बॅक वॉटर आणि बिंदुसरा धरणामध्ये ५०% जवळपास पाणी असताना बीड शहरातील लोकांना बारा ते पंधरा दिवस थांबण्याची पिण्याच्या पाण्याची वाट बघण्याची वेळ आपल्या आदर्श नगर पालिके मुळे आली आहे गल्लोगल्ली फुटलेल्या पाईप लाईन त्यामधून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे याचं सर्व श्रेय नगराध्यक्ष साहेबांना चा आहे मात्र पाईपलाईन लिकेज च्या नावाखाली व त्याला पाठीशी घालण्याचे काम हीच आदर्श नगरपालिका करत आहे या सर्व भ्रष्टाचाराबाबत बीड जिल्ह्यातील एक ही विरोधी पक्ष यावर बोलायला तयार नाही स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून घेणारे ज्यांच्याकडे बीड नगरपालिकेचे ट्रकभर पुरावे आहेत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती त्या कथित तक्रारीच सुद्धा काय झालं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडत आहे आमदार विनायक मेटे यांनी बीड नगरपालिकेचे विरोधात सर्व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून गल्लोगल्ली भाषणे देऊन घोटाळ्याचे वाभाडे बाहेर काढले होते परंतु मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर त्यामध्ये काय झाले गेल्या चार वर्षांमध्ये आमदार विनायक मेटे यांनी त्या घोटाळ्याच्या विरोधात भ्र सुद्धा शब्द काढला नाही याचादेखील खुलासा आमदार मेटे यांनी करावा बीड शहरातील सुमारे २५ वार्डमधील पन्नास नगरसेवक आहेत मात्र सर्वाधिकार नगराध्यक्ष असल्यामुळे विरोधी गटातील नगर सेवकांचे विकास कामाच्या बाबतीत कसल्याही पद्धतीचे ऐकलं जात नाही ही वस्तुस्थिती बीड नगरपालिकेची बनली आहे
बीड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले सुभाश रोड माळीवेस धोंडीपुरा सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स बशीर गंज याठिकाणी बीड नगरपालिकेच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाडी पार्क करण्यासाठी एखाद्या पार्किंग शेड सुद्धा किंवा जागा उपलब्ध नाही ज्यावेळेस याठिकाणी खरेदी करण्यासाठी लोक ये-जा करतात त्या ठिकाणी रस्त्यावरच गाड्या लावण्याची वेळ या पालिका प्रशासनामुळे लोकांवर आली आहे. बीडच्या आदर्श नगरपालिका म्हणून पुरस्कार विकत घेणार्या नगरपालिकेच्या सिओ नगराध्यक्षांनी शहरातील लोकांसाठी माता भगिनींसाठी बीड शहरातील महत्त्वाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ नगरपालिकेच्या माध्यमातून एक हे स्वच्छता ग्रह नगरपालिकेला उभारता आले नाही हे नगराध्यक्षांचे सुंदर व स्वच्छ शहर आहे पुरुष व युवकांचे काय त्यांना लघवी करायचे असेल तर याच्या त्याच्या घराच्या पाठीमागे किंवा दुकानाच्या पाठीमागे जाण्याची वेळ आली आहे परंतु महिलांना माझ्या माता आणि भगिनींना काय सुविधा आहे याची माहिती नगराध्यक्ष साहेबांनी द्यावी, अशी मागणी केके वडमारे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment