Monday, July 6, 2020

परळी शहरात संचारबंदी कालावधीत अतिआवश्यक सेवेमधील अधिकारी कर्मचारी यांना पेट्रोल वितरण-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड,  दि. ६:--परळी शहरात ८ दिवसांसाठी १२ जुलै रोजी रात्री १२.०० वा.पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली असून या कालावधीत केवळ अतिआवश्यक सेवेमधील अधिकारी- कर्मचारी यांना पेट्रोल वितरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी  यांनी ठरवून दिलेल्या दिनांक व वेळेप्रमाणे परळी शहरातील पेट्रोलपंप चालू ठेवण्यास सुट देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत 
 परळी शहरातील स्टेट बैंक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने परळी शहरातून इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून
फौजदारी प्रक्रीया संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार परळी शहरात ०८ दिवसांसाठी (१२ जुलै रोजी रात्री १२.०० वा.पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे.
 यामुळे उपविभागीय अधिकारी, परळी यांनी सदरील संचारबंदीच्या अनुषंगाने अतिआवश्यक सेवेमधील अधिकारी व कर्मचारी यांना पेट्रोल वितरण करण्याच्या अनुषंगाने परळी शहरातील पेट्रोल पंप सुरु ठेवण्यासाठी सदर कार्यवाही केली आहे. 
००००

No comments:

Post a Comment