* पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.
परळी वैजनाथ ;-(प्रतिनिधी)संपूर्ण बीड जिल्ह्यात 12 जुलै पर्यंत संचारबंदी लागू असतानाही परळी शहरातील एका भागात चार चाकी वाहनातून सुमारे तीन लाख रुपयांचा गुटखा खुलेआम आलाच कसा ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज सकाळी शहरातील बरकतनगर भागात संभाजीनगर पोलीसांनी अवैध गुटखा घेऊन जाणारे बोलेरो पिक अप वाहन पकडला. वाहनासह दोघेजण पोलिसांनी अटक केली आहे .यामुळे गुटखा माफियात खळबळ उडाली आहे.
परळीतील बरकत नगर रोड ला बिलोरी पिकअप वाहनांमध्ये गुटखा असल्याच्या गुप्त माहितीवरून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहिती मिळालेल्या ठिकाणी शहानिशा केली असताना पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप मध्ये राजनिवस गुटखा असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून वाहन चालक सह एक जण पलिसांच्या ताब्यात सदरील कामगीरी पोलीस निरीक्षण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनासखाली पो.ह .व्यकंट भताने पो.ना. दंत्ता गित्ते पो.ना. बाबासाहेब आचार्य यांनी या वाहनसह ड्राइव्हर सह एक जनास पोलीस ठाण्यात हजार केले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान परळी शहरात दि 4 रोजी कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण भेटताच मा.जिल्हाधिकारी यांनी 5 तारखेपासून संपूर्ण परळी शहर संचार बंदी करण्यात आली असता आज अचानक शरतील बरकतनगर येथे हा माल आला कसा जिल्हा बंदी असूनही चेकपोस्ट वरून वाहन गुटखा माल घेऊन शहरात प्रवेश कसे करतात विशेष म्हणजे सदर वाहनाचे ट्रान्सपोर्ट पास बाद होऊनही वाहन ट्रान्सपोर्ट कामास चालतो कसा या बाबत शहरात नागरिकांन मध्ये चर्चा सुरू आहे.
No comments:
Post a Comment