Monday, July 13, 2020

राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या टिपरच्या धडकेने तरूणाचा मृत्यू .


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी तालुक्यातील मौजे लाडझरी बस स्टँडवर समोरून पायी जात असतांना राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या टिपरने जोराची धडक दिल्याने तरूणाचा जागाची मृत्यू झाल्याची घटना 12 जुलै रोजी 6 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात शोकाकळा पसरली आहे.
यावर सविस्तर माहिती अशी की, दि.12 जुलै 2020 रोजी.सायकळी 6 वाजता परळी तालुक्यातील लाडझरी या ठिकाणी उमाकांत रामराव मुंडे वय 33 वर्षे बस स्टँड पासून पायी जात असतांना धर्मापुरी ते अंबाजोगाई माहामार्गावरून राखेची अवैध वाहतूक करणारा एम.एच.24 यु 9396 या टिपरने जोराची धडक दिल्याने सदर तरूणाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान तालुक्यात अवैध राखेची व वाळूची वाहतूक करण्याऱ्या हायवा टिपरला कोणत्याही प्रकारचा धाक नसल्या कारणाने आणि पोलीसांचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेकांचे बळी जात आहेत. अपघातातील हायवा टिपर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचनामा कामी बीट अमलदार वसंत भताने होते.

No comments:

Post a Comment