नांदेड : (प्रतिनीधी ) जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लाक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचा आदेश पोलिस विभागाकडून काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. या काळात शहर व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात येणार असून नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करु नये. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रय्तन करीत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने ता. १२ जुलै ते २० जुलै दरम्यान पुन्हा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत नागरिकांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment