बीड (प्रतिनीधी )- बीड शहरामध्ये कोरोनाबाधीतांची संख्या लक्षणीय वाढत
असल्यामुळे सर्वसामान्यांसह प्रशासनाची चिंता वाढली अन् आज दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बाधीत रुग्णांच्या इलाक्यात जावून कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांच्या घराघरात जावून कोरोना तपासणी करून घ्या,भिती बाळगू नका, प्रशासन आपल्या सोबत आहे, आपला आणि आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालू नका, बीडच्या कोविड-सेंटरमध्ये उपचार व्यवस्थीत आहे, जेवण व्यवस्थीत आहे, असं म्हणत कोरोनाबाबत जनजागृती केली. जिल्हाधिकार्यांनी
राजूरी वेस ते कारंजा परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या तर अन्य
कन्टेनमेंट झोनमध्ये प्रशासनातले अन्य वरिष्ठ अधिकारी लोकांचे प्रबोधन
करताना आणि आवाहन करताना दिसून आले.गेल्या महिनाभरापूर्वी कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असलेल्या बीड
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि महिन्याभरात मोठ्या
प्रमाणावर रुग्ण आढळून येऊ लागले. बीडसह परळीत रुग्णांची संख्या मोठ्या
प्रमाणावर आहे त्यामुळे बीडमधला पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. कोरोनाचे लक्षण असताना अनेक जण तपासणीसाठी पुढे येत नाहीत. ही बाब जेव्हा जिल्हाधिकारी राहूल
रेखावार यांच्या निदर्शनास आली तेव्हा ते स्वत:हून रस्त्यावर उतरले.
आज सकाळीच त्यांनी कन्टेनमेंट झोन असलेल्या राजूरीवेस ते कारंजा या भागातील घराघरात जावून कोरोनाबाबत जनजागृती केली. भीती बाळगू नका, कोरोना तपासणीकरून घ्या, लक्षणे दिसून आल्यास तात्काळ रुग्णालयात जा, प्रशासन आपल्यासोबत आहे, आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालू नका यासह अन्य बाबी समजून सांगत कोरोना रोखायचा असेल तर तुमची साथ गरजेची आहे, असे म्हणतजिल्हाधिकार्यांनी घराघरात जावून नागरिकांच्या भेटी घेतल्या. अन्य कन्टेनमेंट झोनमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, न.प.चे गुट्टे, डीवायएसपी सावंत, बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलिसनिरीक्षक गजानन जाधव यांच्यासह आरोग्य टीम फिरताना दिसून आल्या.
No comments:
Post a Comment