Thursday, July 9, 2020

रोहित पवार विचार मंच चंद्रपूर च्या वतिने युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भाटारकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण.

वरोरा:–(प्रतिनीधी) राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसा  निमित्त रोहित पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे वृक्षरोपण करण्यात आले 
गावातील हनुमान मंदिर जवळ अभिजित कुडे रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले .
लावलेल्या झाडाला ताराच्या जाडीचे कुंपण ही करण्यात आले . 
या प्रसंगी अभिजित कुडे म्हणाले की, निसर्गामध्ये समतोल साधण्यासाठी झाडांची भूमिका फार मोठी आहे. प्रत्येक झाड हे संजीवनी ऑक्सिजन पुरवते. झाडे नसल्यामुळे जमिनीची धूप होत आहे . पहीले सारखे मोठे मोठे जंगल आता दिसत नाही त्या मुळे पावसावर ही त्याचा परिणाम होत आहे. दुष्काळाची परिस्थिती ओढवत आहे. यावेळी उपसरपंच विलास कुडे, न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष अमोल घोटेकर ,रोशन भोयर ,रणजित कुडे , तेजस उरकुडे , विजय कुडे  , विनोद उरकुडे, सोपान कुडे, राजेंद्र कुडे, प्रशांत उरकुडे, साहिल, सूरज उरकुडे, अमोल विताडे, सूरज उरकुडे ,यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment