Friday, July 10, 2020

केज ते कानडी माळी रोडवर रात्रीच्यावेळी जबरी चोरी करणारे गुन्हेगार पकडले .

 * केज पोलीसांची कामगिरी मुद्देमालासह 3 आरोपी जेरबंद . 
=============
मा . पोलीस अधीक्षक श्री . हर्ष पोद्दार यांनी पोलीस घटकातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस यंत्रणेला चोऱ्या , दरोडे , जबरी चोऱ्या , यांना प्रतिबंध करण्याचे तसेच अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोटीने प्रयत्न करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत . दिनांक 08-07-2020 रोजी पोलीस स्टेशन केज येथे फिर्यादी नामे विजय रामभाऊ कदम यांनी फिर्याद दिल्या वरून गु.र.न .264 / 2020 क .394 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे . या गुन्ह्यात दि.07-07-2020 रोजी 22.30 ते 23.30 वाजण्याच्या सुमारास केस ते कानडीमाळी या रोडवर सोनारवाडा या शेताजवळ रोडवरील पुलावर यातील फिर्यादी विजय रामभाऊ कदम व त्यांचे वडील साक्षीदार नामे राजाभाऊ दत्तात्रय कदम रा . कानडीरोड , केज हे त्यांचे मोटर सायकल वरून शेतामध्ये जात असताना त्यांना तीन इसमानी रोडवर अडवून चाकूचा धाक दाखवून फिर्यादी कडील एक ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 17700 , दोन ग्रॅम सोन्याची कानातील बाळी किंमत 7000 व साक्षीदार याचे खिशातील रोख 5000 रुपये व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 15000 रुपये असे एकूण 44,700 रुपयांचा माल बळजबरीने काढून घेतला . अशा मजकुराचे फिर्यादीवरून आरोपी नामे निखिल मस्के व बबल्या या नावाचा साथीदार व त्याच्या सोबतचा एक अनोळखी इसम विरुद्ध त्यांनी कायदेशीर फिर्याद दिली होती . हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीस विचारपूस केली असता फिर्यादी सोबत तीन आरोपी झटापट करत असताना एका आरोपीचे तोंडावरचे मास्क निघाल्याने फिर्यादीने एका आरोपीस ओळखले होते अशी माहिती दिल्याने त्यावरून आरोपी नामे निखिल उर्फ दाद्या राजाभाऊ मस्के , वय 21 वर्षे रा.क्रांतीनगर , केज या आरोपीस तात्काळताब्यात घेऊन त्याकडे चौकशी करून त्याचे इतर दोन साथीदार कोण होते याची विचारणा केली असता , त्याने त्याचा दुसरा साथीदार आकाश बापू लोंढे वय 29 वर्ष रा.क्रांतीनगर , केज आणि तिसरा साथीदार विशाल उर्फ बबलू सरोवदे , वय 25 वर्ष रा . क्रांतीनगर केज अशी नावे सांगितले . त्यावरून पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी गुप्त बातमीदारांना मार्फत माहिती घेऊन ते लपलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले . त्यानंतर त्या तीन आरोपितांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता आरोपी नामे निखिल उर्फ दाद्या राजाभाऊ मस्के याचे पँटच्या खिशामध्ये दोन ग्राम सोन्याची अंगठी किंमत 7000 रुपये या तसेच फिर्यादीचे पाकीट मिळून आले . या आरोपिताना दि . 08-07-2020 रोजी 21.05 वाजता अटक करण्यात आले आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीतांना दि.09-07-2020 रोजी मा . प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी , केज यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांनी दि.13-07-2020 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे . सदर आरोपीतांकडे अधिक तपास सुरू आहे . त्यातून त्याच दिवशी दि . 07 जुलै 2020 रोजी 21.15 वा माळेगाव ते साळेगाव रोडवर एमएससीबी केंद्रा जवळील पुलाजवळ मोटर सायकल वरून जाणारे फिर्यादी अशोक ऊर्फ पद्माकर चंद्रकांत कूपकर व साथीदार यांना तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील नगदी रक्कम 20,450 व दोन मोबाईल अंदाजे किंमत 7000 रुपये असे एकूण 27450 रु किमतीचा माल हिसकावून जबरीने चोरून नेला , असा गुन्हा युसूफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत दाखल आहे . या गुन्ह्यातील फिर्यादी यांना तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी दाखवले असता त्यातील एका आरोपीला फिर्यादीने ओळखले आहे . त्यानुसार मा . न्यायालयाकडे युसुब वडगाव पोलिसांनी नमूद आरोपीचा ताबा मागितलेला आहे . ताबा मिळाल्यानंतर तपासादरम्यान युसुब वडगाव येथील जबरी चोरी गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार आणि मा . अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर अंबाजोगाई , उपविभागीय पोलिस अधिकारी श्री . राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केजचे पोलीस निरीक्षक श्री . पी . डब्ल्यू . त्रिभुवन सपोनि श्री . मिसळे , सफो 380 / गुजर , पो.ना 1685 / नामदास , पो.ना 1732 / करवंदे , पो.ना 1573 / गवळी , पोकॉ .1624 / शेख , पोकॉ 890 / चादर , यांनी केलेली आहे .

No comments:

Post a Comment